A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धनी तुमचा नि माझा

तरुणपणाचं कौतुक म्हणुनी किती नटू?
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू !

करा थाट तुम्ही सरदारी
अशी बशीन तुमच्या शेजारी
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू !

राजाराणीला चौकट कसली?
मैना राघुच्या पिंजर्‍यात बसली
मैना गाईल गीत प्रीतीचे, पोपट बोले 'विठू विठू'
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.