धन्य धन्य हो प्रदक्षिणा
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थे घडली अम्हां आदिकरूनि काशी
गुरुभजनाचा महिमा नकळे आगमानिगमांसी
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थे घडली अम्हां आदिकरूनि काशी
गुरुभजनाचा महिमा नकळे आगमानिगमांसी
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला
गीत | - | पारंपरिक |
संगीत | - | |
स्वराविष्कार | - | ∙ आर. एन्. पराडकर ∙ जयवंत कुलकर्णी, सुमन कल्याणपूर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, दिगंबरा दिगंबरा |
टीप - • स्वर- आर एन् पराडकर, संगीत- ??? • स्वर- सुमन कल्याणपूर, जयवंत कुलकर्णी, संगीत- ??? |
संपूर्ण पदरचना -
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि
अनुभव जे जाणति ते गुरुपदिंचे अभिलाषी
पदोपदी जाहल्या अपार पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थे घडली आम्हां आदिकरुनि काशी
मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती
नामसंकीर्तने नित्यानंदे नाचती
कोटि ब्रह्महत्या हरती करितां दंडवत
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात
प्रदक्षिणेते करूनि देह भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.