धन्य हा सावित्रीचा चुडा
यमधर्माचा दूत कुणीही खुशाल राहो खडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
भर दरबारी पांचालीचे, सत्त्व लुटावे चारित्र्याचे
सखा श्रीहरी आभरणांचा अखंड घाली सडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
सती अहल्या गौतम-कांता, मुनीवेशाने तिला भोगिता
देवेंद्राच्या देवत्वाला तिथेच गेला तडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
यवन धावला पाठी म्हणुनी जळुनी गेली सती पद्मिनी
जोहाराची कथा सांगतो अजूनि तिथला कडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
भर दरबारी पांचालीचे, सत्त्व लुटावे चारित्र्याचे
सखा श्रीहरी आभरणांचा अखंड घाली सडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
सती अहल्या गौतम-कांता, मुनीवेशाने तिला भोगिता
देवेंद्राच्या देवत्वाला तिथेच गेला तडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
यवन धावला पाठी म्हणुनी जळुनी गेली सती पद्मिनी
जोहाराची कथा सांगतो अजूनि तिथला कडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | चुडा तुझा सावित्रीचा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अहल्या | - | ब्रह्मदेवाची मानसकन्या. गौतम ऋषींची पत्नी. त्यांच्या शापाने ती शिळा झाली होती. रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केला. |
कांता | - | पत्नी. |