पाहिलेस तू ऐकिलेस तू
पाहिलेस तू ऐकिलेस तू
काय पुन्हा रे सांगू?
अपराधाविण कठोर शासन कुठवर मी साहू?
काळजातील धागे तोडून
घरधनी जाता घर हे सोडून
पतिप्रेमाविण कर हे जोडून काय तुला मागू?
येऊ नये ती वेळ येऊन
प्रपंच पूजा गेली उधळून
आसवांची माळ ही ओवून सांग कुणा वाहू?
काय पुन्हा रे सांगू?
अपराधाविण कठोर शासन कुठवर मी साहू?
काळजातील धागे तोडून
घरधनी जाता घर हे सोडून
पतिप्रेमाविण कर हे जोडून काय तुला मागू?
येऊ नये ती वेळ येऊन
प्रपंच पूजा गेली उधळून
आसवांची माळ ही ओवून सांग कुणा वाहू?
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभू |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | बायकोचा भाऊ |
गीत प्रकार | - | चित्रगीत |