A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धरिला पंढरीचा चोर

धरिला पंढरीचा चोर । प्रेमें बांधुनियां दोर ॥१॥

हृदयी बंदिवान केला । आंत विठ्ठल कोंडला ॥२॥

शब्दें केली जडाजडी । पायीं विठ्ठलाचे बेडी ॥३॥

सोहं शब्द नाद केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥

जनी ह्मणे बा विठ्ठला । जीवें सोडीं न मी तुजला ॥५॥
सोहं - मीच ब्रह्म असा भाव.
मूळ रचना

धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर ॥१॥
हृदय बंदिखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥
शब्दें केली जडाजुडी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥३॥
सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुलती आला ॥४॥
जनी ह्मणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.