धाव-पाव सावळे विठाई
धाव-पाव सावळे विठाई का मनी धरिली अढी
अनाथ मी अपराधी देवा, उतरा पैलथडी
एकनाथा घरी पाणी वाहिले गंगेच्या कावडी
कबीराचे ते शेले विणुनी त्याची घालिसे घडी
जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेच्या थडी
गजेंद्राचा धावा ऐकोनि वेगे घालिते उडी
अनाथ मी अपराधी देवा, उतरा पैलथडी
एकनाथा घरी पाणी वाहिले गंगेच्या कावडी
कबीराचे ते शेले विणुनी त्याची घालिसे घडी
जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेच्या थडी
गजेंद्राचा धावा ऐकोनि वेगे घालिते उडी
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | छोटा जवान |
गीत प्रकार | - | चित्रगीत, विठ्ठल विठ्ठल |
कावड | - | जड पदार्थ नेण्यासाठी आडव्या बांबूच्या दोन टोकांस दोन दोर्या बांधून त्याला ओझी अडकवण्याची केलेली व्यवस्था. |
थड | - | नदीचा तीर, किनारा. |