धुंद धुंद ही हवा
धुंद धुंद ही हवा, मंद मंद गारवा
उतरला धरेवरी स्वर्ग हा नवा नवा
चंद्रदीप लावुनी सजले नभमंदिर
धरतीच्या अंगणी ये उजेड शुभ्र सुंदर
चांदण्यात प्रेमिका गवसला गोडवा
अमर तुझ्या प्रीतीने सफल होई जीवन
या सहवासात तुझ्या फुलले रे मधुबन
हे असेच राहू दे प्रीतगीत राजीवा
उतरला धरेवरी स्वर्ग हा नवा नवा
चंद्रदीप लावुनी सजले नभमंदिर
धरतीच्या अंगणी ये उजेड शुभ्र सुंदर
चांदण्यात प्रेमिका गवसला गोडवा
अमर तुझ्या प्रीतीने सफल होई जीवन
या सहवासात तुझ्या फुलले रे मधुबन
हे असेच राहू दे प्रीतगीत राजीवा
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | राम किंकर |
स्वर | - | आशा भोसले, सुरेश वाडकर |
चित्रपट | - | धाकटी मेहुणी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
राजीव | - | कमळ / प्रिय. |