A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ध्यास हा जिवाला

ध्यास हा जिवाला पंढरीसि जाऊ
वैकुंठीचा राणा डोळेभरी पाहू !

पुंडलिकाभेटी परब्रह्म आले
भक्तांचिया काजा विटेवरी ठेले
मधुर नाम त्या माधवाचे गाऊ !

साजिरे ते रूप पुतळा प्रेमाचा
कांसे पीतांबर टिळा कस्तुरीचा
सांवळी विठाई अंतरात ध्याऊ !

तुक्याचे अभंग गाइ चंद्रभागा
साथ देइ वारा भजनाच्या रंगा
रंग तो लुटाया वारकरी होऊ !
काज - काम.
कांस - कंबर / कासोटा, ओटी.
ठेला - उभा राहिलेला / कुंठित.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.