A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिसाहून दाहक झाली रात

दिसाहून दाहक झाली रात
कशाला आलीस ग स्वप्‍नात

तगमग तगमग अशी निशिदिनी
उरे वेदना भरून जीवनी
पुन्हा का घावावर आघात?

साद घातली निरोप दिधले
कधी न वळली तुझी पाऊले
अभागी माझ्या या सदनात

नीज निमिषभर थकल्या नयनी
तीही तुडविलीस का ग चरणी
जाळितो जिवासी एकान्‍त
निमिष - पापणी लवण्यास लागणारा काळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.