A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
केव्हा कसा येतो वारा

केव्हा कसा येतो वारा
जातो अंगाला वेढून
अंग उरते न अंग
जाते अत्तर होऊन.

खाली सुगंधित तळे
उडी घेतात चांदण्या
हेलावत्या सुवासात
कशा डुंबती चिमण्या

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.