दिवा लाविते दिवा
नवीन आले साल आजला
उजेड पडला नवा, दिवा लाविते दिवा
घरी पाहुणे आले मामा
धरणीच्या घरी जसा चंद्रमा
अंधाराला येई उजाळा, थंड सुवासिक हवा
दिव्यादिव्यांच्या लावून ओळी
करीन साजरी आज दिवाळी
आकाशीही दिवा चढविला, आभाळा दे दुवा
उजेड पडला नवा, दिवा लाविते दिवा
घरी पाहुणे आले मामा
धरणीच्या घरी जसा चंद्रमा
अंधाराला येई उजाळा, थंड सुवासिक हवा
दिव्यादिव्यांच्या लावून ओळी
करीन साजरी आज दिवाळी
आकाशीही दिवा चढविला, आभाळा दे दुवा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | तू सुखी रहा |
राग | - | केदार |
गीत प्रकार | - | चित्रगीत |