दिवस ओल्या पाकळ्यांचे
दिवस ओल्या पाकळ्यांचे, जाणिवांना गंध ओले
स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले
दिवस वेडे स्वप्नपंखी, रेशमाची झूल झाले
ओंजळीने मागण्याआधीच झरले मेघ सारे
दिवस थोडे स्पर्शवेडे, दोन आतुरल्या जिवांचे
हरवलेले भान केवळ श्वास होते बोललेले
दिवस मोहरल्या मनाचे, सुख नवे घेऊन आले
चांद थोडा लाजला अन् चांदणे टिपूर झाले
स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले
दिवस वेडे स्वप्नपंखी, रेशमाची झूल झाले
ओंजळीने मागण्याआधीच झरले मेघ सारे
दिवस थोडे स्पर्शवेडे, दोन आतुरल्या जिवांचे
हरवलेले भान केवळ श्वास होते बोललेले
दिवस मोहरल्या मनाचे, सुख नवे घेऊन आले
चांद थोडा लाजला अन् चांदणे टिपूर झाले
| गीत | - | गुरु ठाकूर |
| संगीत | - | निलेश मोहरीर |
| स्वर | - | बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर |
| चित्रपट | - | मंगलाष्टक वन्समोअर |
| गीत प्रकार | - | युगुलगीत, चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर