दिव्यत्वाची जेथ प्रतीती
दिव्यत्वाची जेथ प्रतीती
तेथें कर माझे जुळती.
गाळुनियां भाळींचे मोती
हरीकृपेचे मळे उगविती
जलदांपरी येउनियां जाती
जग ज्यांची न करी गणती-
तेथें कर माझे जुळती.
यज्ञीं ज्यांनी देउनि निजशिर
घडिलें मानवतेचें मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहिं चिरा नाहीं पणती-
तेथें कर माझे जुळती.
जिथें विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसें काळिज निखळी
एकाची सगळी वसती-
तेथें कर माझे जुळती.
मध्यरात्रिं नभघुमटाखालीं
शांति शिरीं तम चंवर्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळीं
एकान्तीं डोळे भरती-
तेथें कर माझे जुळती.
तेथें कर माझे जुळती.
गाळुनियां भाळींचे मोती
हरीकृपेचे मळे उगविती
जलदांपरी येउनियां जाती
जग ज्यांची न करी गणती-
तेथें कर माझे जुळती.
यज्ञीं ज्यांनी देउनि निजशिर
घडिलें मानवतेचें मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहिं चिरा नाहीं पणती-
तेथें कर माझे जुळती.
जिथें विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसें काळिज निखळी
एकाची सगळी वसती-
तेथें कर माझे जुळती.
मध्यरात्रिं नभघुमटाखालीं
शांति शिरीं तम चंवर्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळीं
एकान्तीं डोळे भरती-
तेथें कर माझे जुळती.
गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | वसंत प्रभू |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | पुत्र व्हावा ऐसा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत |
टीप - • काव्य रचना- १६ फेब्रुवारी १९३३. |
चवरी (चामर) | - | वनगाईच्या केसांच्या झुबक्यास सोने अथवा चांदीची दांडी बसवून देव, राजा किंवा इतर मोठी व्यक्ति यांच्या अंगावरील माशा वगैरे उडवण्यासाठी केलेले कुंच्यासारखे साधन. |
चिरा | - | बांधकामाचा दगड. |
जलद | - | मेघ. |
तम | - | अंधकार. |
प्रतीती | - | अनुभव. |