डोळे कशासाठी
डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी
आला भरून पाऊस, नको एकटा जाऊस
अरे सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी
नाव तुझे मनातले, चांदणेच रानातले
शब्द कशासाठी, तुला आठवून भरून येण्यासाठी
वेल मोहरून आली, फुले अंगभर झाली
वारा कशासाठी, गंधवनातून पाखरू होण्यासाठी
असा तुझा भरवसा, चांदण्याचा कवडसा
ओठ कशासाठी, थोडे थरारून जुळून जाण्यासाठी

गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | अनुराधा पौडवाल, अरुण दाते |
गीत प्रकार | - | भावगीत, युगुलगीत, नयनांच्या कोंदणी |