डोळे मोडित गौळण राधा
          डोळे मोडित गौळण राधा
हिला जडली मोहन बाधा
भाळल्या कितिक गौळणी
राधिका कोर चांदणी
बाळ मुकुंद राजस गुणी
कसे बाई लाविले नादा
किती बाई काळाकाळा
दिसे अचुकच कान्हा डोळा
वरपांगी भाव ग भोळा
नाही नंदलाल हा साधा
मुरलीची करी ग पिचकारी
रंगवी हरी ब्रिज नारी
लाजता हसे गिरिधारी
रंगात रंगली राधा
          हिला जडली मोहन बाधा
भाळल्या कितिक गौळणी
राधिका कोर चांदणी
बाळ मुकुंद राजस गुणी
कसे बाई लाविले नादा
किती बाई काळाकाळा
दिसे अचुकच कान्हा डोळा
वरपांगी भाव ग भोळा
नाही नंदलाल हा साधा
मुरलीची करी ग पिचकारी
रंगवी हरी ब्रिज नारी
लाजता हसे गिरिधारी
रंगात रंगली राधा
| गीत | - | राजा बढे | 
| संगीत | - | स्नेहल भाटकर | 
| स्वर | - | आशा भोसले | 
| चित्रपट | - | संत बहिणाबाई | 
| गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर, नयनांच्या कोंदणी | 
| डोळे मोडणे | - | डोळ्यांनी खुणा करणे, नखर्यांनी पाहणे. | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
  
  
  
  
  
  
  
  
  
  











 आशा भोसले