डोळे तुझे शराबी
डोळे तुझे शराबी
मज आणिती नशा
तू सांग चारुगात्री का लाविसी तृषा !
हातात हात देता
जवळी अशीच घेता
सरतो प्रकाश माझा, उरते तुझी निशा !
हळुवार स्पर्श सारे
देती मुके इशारे
बेहोष जीवनाची चुकली कुणा दिशा?
संपेल रात्र आता
क्षण हे निघून जाता
प्राचीवरी मनाच्या माझीच तू उषा !
मज आणिती नशा
तू सांग चारुगात्री का लाविसी तृषा !
हातात हात देता
जवळी अशीच घेता
सरतो प्रकाश माझा, उरते तुझी निशा !
हळुवार स्पर्श सारे
देती मुके इशारे
बेहोष जीवनाची चुकली कुणा दिशा?
संपेल रात्र आता
क्षण हे निघून जाता
प्राचीवरी मनाच्या माझीच तू उषा !
गीत | - | गुरुनाथ शेणई |
संगीत | - | वेणुकांत नार्वेकर |
स्वर | - | रामदास कामत |
गीत प्रकार | - | भावगीत |
गात्र | - | शरीराचा अवयव. |
चारू | - | सुंदर. |
तृषा | - | तहान. |
प्राची | - | पूर्वदिशा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.