A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
डोंगर काठाडी ठाकरवाडी

डोंगर काठाडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी

भगताचा नाग्या हुम्मण भारी
गर्दीत धावर्‍या हुल्लड होरी
डोंगरपारी जुनी पथारी
ठाकरवाडीच्या डोलती वरी

झिंगून कोनी झिंगून कोनी
झिंगून कोनी अंग झोकुनी
फाटक्या वस्तीला जल्माच्या खनी
भगताचा नाग्या हुल्लड होरी
जुन्याच गोष्टी देवाच्या पारी
ऐकत बसते ठाकरवाडी
ठाकरवाडीच्या झोपड्या चारी

 

  चंद्रकांत काळे, रवींद्र साठे