A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दृष्ट कुणाची लागू नये ग

दृष्ट कुणाची लागू नये ग
माझ्या राजस बाळा
ही सोन्याची आली घटिका
सोडू कशी वेल्हाळा

रूपगुणाचा तेजदीप हा
शौर्याचाही मेरू अतिमहा
मुकुट शिरावर असा घालिता
विष्णु दिसे सावळा
गीत - शांताराम नांदगांवकर
संगीत - अशोक पत्की
स्वर- आशालता वाबगावकर
नाटक - कैकेयी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या 'कैकेयी' नाटकाच्या लेखिका ललिता बापट आहेत. 'कैकयी' हे वि. वा. शिरवाडकरांचे जे नाटक आहे, ते वेगळे.
मेरू - एक पर्वत.
वेल्हाळ - परम प्रीतिपात्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.