A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दूर कुठे राउळात दरवळतो

दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया!
सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या!

असह्य एकलेपणा, आस आंसवी मिळे
काय अंतरात ते अजून ना कुणा कळे
झाकळून जाय गाव, ये तमास पूर या!

दूर वास रे तुझा, ध्यास लागला मनी
दृष्टिभेटही नसे काय सांगणे जनी
एकवार तूच ये सखीस धीर द्यावया!

सलत सूर सनईचा वारियात कापरा
सुकून पाकळी मिटे मूक भाव लाजरा
फुलांत गंध कोंदला, वाट ना उरे तया!
गीत- ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - आशा भोसले
चित्रपट- अंमलदार
राग- पूरिया
गीत प्रकार - चित्रगीत
राऊळ - देऊळ.
सल - टोचणी.