A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दूर राहुनी पाहु नको रे

दूर राहुनी पाहु नको रे
प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे
प्रिया जाऊ नको रे

कसा इशारा तुला कळेना
शब्द मिळाले सूर जुळेना
कळली तुझी कला
घे ना जवळ मला
नखर्‍याचा रंग मला दावू नको रे
प्रिया जाऊ नको रे

अवतीभवती बहर फुलांचा
भ्रमर लुटेना थेंब मधाचा
लाजे कळी कळी
गाली पडे खळी
फिरवून पाठ असा राहू नको रे
प्रिया जाऊ नको रे

भाव मनीचे जाणून घ्यावे
दोन जिवांचे धागे जुळावे
सांगू कशी तुला
माझ्या प्रीतफुला
हुरहुर आज अशी लावू नको रे
प्रिया जाऊ नको रे
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - प्रभाकर जोग
स्वर- आशा भोसले
चित्रपट - दाम करी काम
गीत प्रकार - चित्रगीत