A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एक दिलाने एक मुखाने

एक दिलाने एक मुखाने दुमदुमवा संदेश
गोवा-कोकण-वर्‍हाड-दख्‍खन एक मराठा देश

एकच आहे शांतादुर्गा-तुळजा-मायभवानी
एकच ही कोकणी-पुणेरी-नागपुरी-अहिराणी
एक असे हा भीमाशंकर-महादेव-मंगेश

मंगेशाला नवस बोलती देशावरल्या माता
गोमंताचे हृदय हालते नाव विठूचे गाता
म्हणा तुकोबा म्हणा सोयरा, एक हृदय दो वेष

शेतमळ्यांची कुळागरांची एकच आहे आशा
हिंदु म्हणा वा म्हणा इसाई, ही वरवरची भाषा
धमनीमधले रक्त एक हे, एक असे हृदयेश
गीत - वसंत बापट
संगीत - जितेंद्र कुलकर्णी
स्वर- सचिन पिळगांवकर
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• या गीतात मा. दीनानाथ मंगेशकर आणि त्यांच्या कन्या (लता, आशा, उषा, मीना) यांचा संदर्भ चवथ्या कडव्यात वापरला आहे.
कुळागर - पोफळीचा बाग.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.