एका हिरव्यागार कुरणी
एका हिरव्यागार कुरणी फुलली होती फुले
एक कळी उमलेच ना..
सूर्याच्या प्रकाशामधे मोहरली फुले
झुडुपांच्या कुशीत या दडली होती फुले
होती वेधक सातरंगी फुलली बाग सुरेख
एक कळी उमलेच ना..
वेलीवरल्या पानांमधून ओघळली फुले
टवटवीत ही हासत होती मोहक अत्तर-फुले
झाली मलूल एक वेल, कोमेजली तिची फुले
एक कळी उमलेच ना..
मंद धुंद रातराणी गंध वाहतो
रंग वेधतो गुलाब भान हेलावतो
विसरे सुवास या फुलांचा, सुकली कोमल वेल
एक कळी उमलेच ना..
एक कळी उमलेच ना..
सूर्याच्या प्रकाशामधे मोहरली फुले
झुडुपांच्या कुशीत या दडली होती फुले
होती वेधक सातरंगी फुलली बाग सुरेख
एक कळी उमलेच ना..
वेलीवरल्या पानांमधून ओघळली फुले
टवटवीत ही हासत होती मोहक अत्तर-फुले
झाली मलूल एक वेल, कोमेजली तिची फुले
एक कळी उमलेच ना..
मंद धुंद रातराणी गंध वाहतो
रंग वेधतो गुलाब भान हेलावतो
विसरे सुवास या फुलांचा, सुकली कोमल वेल
एक कळी उमलेच ना..
गीत | - | विजय बोंद्रे |
संगीत | - | शांक-नील |
स्वर | - | अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे |
नाटक | - | गुहागर |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, युगुलगीत |