एकटेच येणे येथे
एकटेच येणे येथे, एकटेच जाणे
एकट्याच जिवाचे हे एकटेच गाणे
कितिक पांथ येती-जाती मार्ग तोच आहे
जुने-नवे कसले पाणी? ओघ तोच वाहे !
धाडिले जयाने येथे, तोच सर्व जाणे
एकट्याच मार्गी नाही संगतीस कोणी
आपुलीच आपण न्यावी शिरावरी गोणी
भार वाहताना खोटी आसवे वहाणे
कुठुन कुठे आला रस्ता आणि कुठे जाई?
कुठे जावयाचे आहे तेही कळत नाही
पावलांस एकच ठावे, पुढे पुढे जाणे !
एकट्याच जिवाचे हे एकटेच गाणे
कितिक पांथ येती-जाती मार्ग तोच आहे
जुने-नवे कसले पाणी? ओघ तोच वाहे !
धाडिले जयाने येथे, तोच सर्व जाणे
एकट्याच मार्गी नाही संगतीस कोणी
आपुलीच आपण न्यावी शिरावरी गोणी
भार वाहताना खोटी आसवे वहाणे
कुठुन कुठे आला रस्ता आणि कुठे जाई?
कुठे जावयाचे आहे तेही कळत नाही
पावलांस एकच ठावे, पुढे पुढे जाणे !
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | कैलासनाथ जैस्वाल |
गीत प्रकार | - | भावगीत |
पांथस्थ | - | वाटसरू. |