एकटी मी एकटी
एकटी मी एकटी, एकटी मी एकटी
संचिताचे खेळ सारे दुष्ट दैवाची गती
शांतवू केवि मनाला, हाक मी मारू कुणाला
भाग्य होता पाठमोरे आप्तबंधू पांगती
भंग झाला भावनांचा, रंग गेला जीवनाचा
हास्य लोपे लोचनांचे अश्रूधारा वाहती
आग पेटे भोवताली स्वप्नपुष्पे दग्ध झाली
मृत्यूही होई न माझा सोबती या संकटी
संचिताचे खेळ सारे दुष्ट दैवाची गती
शांतवू केवि मनाला, हाक मी मारू कुणाला
भाग्य होता पाठमोरे आप्तबंधू पांगती
भंग झाला भावनांचा, रंग गेला जीवनाचा
हास्य लोपे लोचनांचे अश्रूधारा वाहती
आग पेटे भोवताली स्वप्नपुष्पे दग्ध झाली
मृत्यूही होई न माझा सोबती या संकटी
| गीत | - | शांताराम आठवले |
| संगीत | - | वसंत पवार |
| स्वर | - | आशा भोसले |
| चित्रपट | - | सुभद्राहरण |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
| केविं | - | कशा प्रकारे. |
| संचित | - | पूर्वजन्मीचे पापपुण्य. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले