एकविरा आई तू डोंगरावरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यावरी
कोल्याचा धंदा हाय जीवा उधारी
पाठीशी उभी हाय एकविरा आई
धनी माझा गेलाय बारांडोलीला
अवचित सुटलाय वादली वारा
मागणं मागतंय एकविरा आई
धनी माझा येऊंदेस दर्या किनारी
दसर्याचे आई तुझे सणाला
जोड्यांशी येऊ आई तुझे होमाला
नवसाचा मान देऊ कोंबड्या-बकर्यांचा
खणा-नारळाशी भरीन ओटी
चैताचे आई तुझे सणाला
पोरांशी येऊ आई तुझे भेटीला
नजर हाय तुझी कोल्यावरी
कोल्याचा धंदा हाय जीवा उधारी
पाठीशी उभी हाय एकविरा आई
धनी माझा गेलाय बारांडोलीला
अवचित सुटलाय वादली वारा
मागणं मागतंय एकविरा आई
धनी माझा येऊंदेस दर्या किनारी
दसर्याचे आई तुझे सणाला
जोड्यांशी येऊ आई तुझे होमाला
नवसाचा मान देऊ कोंबड्या-बकर्यांचा
खणा-नारळाशी भरीन ओटी
चैताचे आई तुझे सणाला
पोरांशी येऊ आई तुझे भेटीला
| गीत | - | काशिराम चिंचे |
| संगीत | - | विजय कठीण |
| स्वर | - | शैला चिखले |
| गीत प्रकार | - | कोळीगीत (दर्यागीत), या देवी सर्वभूतेषु |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












शैला चिखले