एवढंच ना
एवढंच ना.. एकटे जगू.. एवढंच ना..
आमचं हसं, आमचं रडं
घेऊन समोर एकटेच बघू.. एवढंच ना..
रात्रीला कोण? दुपारला कोण?
जन्माला अवघ्या या पुरलंय कोण?
श्वासाला श्वास, क्षणाला क्षण,
दिवसाला दिवस जोडत जगू.. एवढंच ना..
अंगणाला कुंपण होतंच कधी?
घराला अंगण होतंच कधी?
घराचे भास, अंगणाचे भास,
कुंपणाचे भासच भोगत जगू.. एवढंच ना..
आलात तर आलात; तुमचेच पाय !
गेलात तर गेलात, कुणाला काय?
स्वतःचं पाय, स्वतःचं वाट,
स्वतःचं सोबत होऊन जगू.. एवढंच ना..
मातीचं घर, मातीचं दार,
(मातीच घर, मातीच दार)
मातीच्या देहाला मातीचे वार
मातीच खरी, मातीच बरी,
मातीत माती मिसळत जगू.. एवढंच ना..
आमचं हसं, आमचं रडं
घेऊन समोर एकटेच बघू.. एवढंच ना..
रात्रीला कोण? दुपारला कोण?
जन्माला अवघ्या या पुरलंय कोण?
श्वासाला श्वास, क्षणाला क्षण,
दिवसाला दिवस जोडत जगू.. एवढंच ना..
अंगणाला कुंपण होतंच कधी?
घराला अंगण होतंच कधी?
घराचे भास, अंगणाचे भास,
कुंपणाचे भासच भोगत जगू.. एवढंच ना..
आलात तर आलात; तुमचेच पाय !
गेलात तर गेलात, कुणाला काय?
स्वतःचं पाय, स्वतःचं वाट,
स्वतःचं सोबत होऊन जगू.. एवढंच ना..
मातीचं घर, मातीचं दार,
(मातीच घर, मातीच दार)
मातीच्या देहाला मातीचे वार
मातीच खरी, मातीच बरी,
मातीत माती मिसळत जगू.. एवढंच ना..