गात रहा रे
गात रहा रे, गात रहा रे, गात रहा रे मधुगान
पूस जगाचे आसू
सकल दिशांतुन घोर निशांतुन पेरित जा तू हासू
जीवन हे वरदान
सत्य सनातन दे तुज हाक
अखिल चराचर गाते, तू धरि रे धरि रे ताल
फुलव सुरांनी रान
जाळून टाक निराशा
जा फुलवित तू आशा
या छंदाला आनंदाला देइ सुरांची भाषा
जरि तुज जागोजागी
दिसतिल कुणि हतभागी
दे संजीवन दे नवजीवन तू त्या दीनांलागी
देउ नको तू करुणा
आकांक्षांचे नूतन लोचन दे सकलां नवतरुणां
शिकव नवा अभिमान
पूस जगाचे आसू
सकल दिशांतुन घोर निशांतुन पेरित जा तू हासू
जीवन हे वरदान
सत्य सनातन दे तुज हाक
अखिल चराचर गाते, तू धरि रे धरि रे ताल
फुलव सुरांनी रान
जाळून टाक निराशा
जा फुलवित तू आशा
या छंदाला आनंदाला देइ सुरांची भाषा
जरि तुज जागोजागी
दिसतिल कुणि हतभागी
दे संजीवन दे नवजीवन तू त्या दीनांलागी
देउ नको तू करुणा
आकांक्षांचे नूतन लोचन दे सकलां नवतरुणां
शिकव नवा अभिमान
गीत | - | वसंत बापट |
संगीत | - | कनू घोष |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |