गाव कोसाला पाणतळ्याला
गाव कोसाला, पाणतळ्याला
सात गौळणी, आल्या पाण्याला.
तांब्या घागरी, पाणी भरती
सार्या गौळणी, खेळ मांडती.
एक गौळण, गीत म्हणते
पाणी फेकते, चोळी भिजते
नाव घेण्याचा, हट्ट धरते
पाणी सांडते-
आंब्या साप्याचं, हिरव्या चाफ्याचं
नाव घेते वोऽ नाव घेते वोऽ
चांद मोत्याचा, भांग मोत्याचा
भाळी चांदवा, माह्या राजाचाऽ
सात गौळणी, आल्या पाण्याला.
तांब्या घागरी, पाणी भरती
सार्या गौळणी, खेळ मांडती.
एक गौळण, गीत म्हणते
पाणी फेकते, चोळी भिजते
नाव घेण्याचा, हट्ट धरते
पाणी सांडते-
आंब्या साप्याचं, हिरव्या चाफ्याचं
नाव घेते वोऽ नाव घेते वोऽ
चांद मोत्याचा, भांग मोत्याचा
भाळी चांदवा, माह्या राजाचाऽ
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | उत्तरा केळकर |
गीत प्रकार | - | कविता |
पाणथळ | - | दलदल. |