A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझिया प्रियाला प्रीत (२)

घेवून येशी कोवळे ऋतु सुगंधी सात हे
नवीन भाषा कोणती? नजर काही बोलते
सार्‍या सरी या माझ्याचपाशी चिंब तू होईना
माझिया प्रियाला प्रीत कळेना !

नवीन तारे चंद्र नवा हा
नवीन आहे ऋतु हवासा
अनोळखी हा बहर घेऊन पुन्हा पुन्हा भेटना
माझिया प्रियाला प्रीत कळेना !

तुझी नि माझी भेट ती
क्षणोक्षणी का आठवे
आधी कधी ना वाटले
काही तरी होते नवे
सांगू कशा मी तुला सख्या रे
माझ्या या भावना
माझिया प्रियाला प्रीत कळेना !

जागुन तारे मोजतो आहे
तुझ्यात मीही रूजतो आहे
कधी तुला ग कळेल सारे, खेळ आहे जुना
माझिया प्रियाला प्रीत कळेना !
गीत - अश्विनी शेंडे
संगीत - अशोक पत्की
स्वर- महालक्ष्मी अय्यर, स्वप्‍नील बांदोडकर
गीत प्रकार - मालिका गीते
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- माझिया प्रियाला प्रीत कळेना, वाहिनी- झी मराठी.

 

  महालक्ष्मी अय्यर, स्वप्‍नील बांदोडकर