A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मधु इथे अन्‌ चंद्र तिथे

मधु इथे अन्‌ चंद्र तिथे झुरतो अंधारात
अजब ही मधुचंद्राची रात

एक चंद्र अन्‌ अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे
हवी झोपडी, मिळे कोठडी सरकारी खर्चात
अजब ही मधुचंद्राची रात

माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले
ताटातुटीने सुरेख झाली संसारा सुरवात
अजब ही मधुचंद्राची रात

किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्तीत
अशी निघाली लग्‍नानंतर वार्‍यावरती वरात
अजब ही मधुचंद्राची रात

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  आशा भोसले, महेंद्र कपूर