गडद जांभळं भरलं आभाळ
गडद जांभळं
भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
सांजेच्या मलूल
धुळवड येळेला
भरल्या पदरानं झाकावी भूल
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
सांजेच्या मलूल
धुळवड येळेला
भरल्या पदरानं झाकावी भूल
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | उत्तरा केळकर, रवींद्र साठे, अरुण इंगळे |
चित्रपट | - | एक होता विदूषक |
गीत प्रकार | - | चित्रगीत, ऋतू बरवा |
Print option will come back soon