A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सप्रेम नमस्कार विनंती

सप्रेम नमस्कार विनंती विशेष !
तुझ्यावाचुन मला कटवेना सखे ग परदेश

आठप्रहर तुम्हासंगती राहते राया
का शंका अशी जीवघेणी मनामधे वाया
सावलीपरी मी उभी बिलगुनी पाया
नको ठेवू मनाच्या ग मनी, राग लवलेश !

उणे-अधिक बोललो, कधी विसरुनी जावे
रागाने रंगते प्रीत मला ते ठावे
जाणसी सखे तू, तुला काय सांगावे?
एक मात्र सांगते, नारीचा नारी करी द्वेष

तुजवाचून दुजा नारीला उरी ना जागा
सांगेन जसे मी तसे यापुढे वागा
केतकीचा पुरे ग गंध झुलिवण्या नागा
दोन कुड्यांमध्ये जीव एक, असा न आदेश

तुझ्या मनातले वाचले रे
माझे थयथय मन नाचले
चंद्रलोकात मी पोचले
तूच एकला प्रियकर माझा प्रीतीचा परमेश

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. वसंतराव देशपांडे, मधुबाला जव्हेरी