A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पानापानांत दिसतो कान्हा

पानापानांत दिसतो कान्हा
फुले तोडू कशी मी सांगा ना

गोकुळीचा हा कृष्णकन्हैया
हा गोपींचा बन्सी बजैय्या
या राधेचा भूलभुलैय्या
कशी सावरू मी भोळ्या मना

मी धरू जाता, येई न हाता
वळुनी हसतो लपताछपता
बावरुनी मी हळूच बघता
झाडामागून करतो खुणा

बासुरीच्या या सूरांत न्हाली
चिंब राधिका भिजुनी ओली
कृष्णरूप ही छाया झाली
आता सरला परकेपणा