A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गाडी आली गाडी आली

गाडी आली गाडी आली- झुक्‌ झुक्‌ झुक्‌
शीट कशी वाजे बघा- कुक्‌ कुक्‌ कुक्‌

इंजिनाचा धूर निघे- भक्‌ भक्‌ भक्‌
चाके पाहू तपासून- ठक्‌ ठक्‌ ठक्‌

जायाचे का दूर कोठे- भूर्‌ भूर्‌ भूर्‌
कोठेही जा नेऊ तेथे- दूर्‌ दूर्‌ दूर्‌

तिकिटाचे पैसे काढा- छ्न्‌ छ्न्‌ छ्न्‌
गाडीची ही घंटा वाजे- घण्‌ घण्‌ घण्‌

गाडीमधे बसा चला- पट्‌ पट्‌ पट्‌
सामानाही ठेवा सारे- चट्‌ चट्‌ चट्‌

नका बघू डोकावून- शुक्‌ शुक्‌ शुक्‌
गाडी आता निघालीच- झुक्‌ झुक्‌ झुक्‌
गीत - वि. म. कुलकर्णी
संगीत - यशवंत देव
स्वर-
गीत प्रकार - बालगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.