A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गगनीचे नंदादीप जळती

गगनीचे नंदादीप जळती, गगनीचे नंदादीप जळती
साठविण्या गुरुमूर्ती लोचनी भक्तगणही जमती

पंचप्राणांचे हे निरांजन, भक्तीची ही वातही भिजवून
श्रद्धेचे ते स्‍नेह घालुनी उजळियल्या ज्योती

असंख्य लोचन असंख्य ज्योती, श्रद्धेची ही भव्य प्रचिती
त्या दीपांच्या दिव्य प्रकाशी श्री सद्गुरू मूर्ती

शैलगमन यात्रेच्या स्मृतीदिनी, नगर सुशोभित सुंदर करुनी
भाविक संत भक्त सुवासिनी आनंदा लुटती