गाइ पाण्यावर काय
गाइ पाण्यावर काय म्हणुनी आल्या?
कां ग गंगायमुनाहि या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला
कोण माझ्या बोललें गोरटीला?
विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाचीं पोलकीं छिटें लेती.
तुला 'लंकेच्या पार्वती'समान
पाहुनीयां, होवोनि साभिमान
काय त्यांतिल बोलली एक कोण
'अहा ! - आली ही पहा - भिकारीण !'
पंकसंपर्कें कमळ का भिकारी?
धूलिसंसर्गें रत्न का भिकारी?
सूत्रसंगें सुमहार का भिकारी?
कशी तूंही मग मजमुळें भिकारी?
लाट उसळोनी जळीं खळें व्हावें,
त्यांत चंद्राचें चांदणें पडावें;
तसें गालीं हासतां तुझ्या व्हावें,
उचंबळुनी लावण्य वर वहावें !
नारि मायेचें रूप हें प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तूं !
तुला घेइन पोलकें मखमलीचें,
कुडीं मोत्यांचीं, फूल सुवर्णाचें;
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परि आवरिं हा प्रलय महाभारी !
प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे,
कोड किंचित् पुरवितां न ये त्यांचें;
तदा बापाचें हृदय कसें होतें,
नये वदतां, अनुभवी जाणती तें !
देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गांवास जाउनीयां
गूढ घेतों हें त्यास पुसोनीयां !
"गांविं जातों," ऐकतां त्याच कालीं
पार बदलुनी ती बालसृष्टि गेली !
गळां घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येतें मी" पोर अज्ञ वाचा !
कां ग गंगायमुनाहि या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला
कोण माझ्या बोललें गोरटीला?
विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाचीं पोलकीं छिटें लेती.
तुला 'लंकेच्या पार्वती'समान
पाहुनीयां, होवोनि साभिमान
काय त्यांतिल बोलली एक कोण
'अहा ! - आली ही पहा - भिकारीण !'
पंकसंपर्कें कमळ का भिकारी?
धूलिसंसर्गें रत्न का भिकारी?
सूत्रसंगें सुमहार का भिकारी?
कशी तूंही मग मजमुळें भिकारी?
लाट उसळोनी जळीं खळें व्हावें,
त्यांत चंद्राचें चांदणें पडावें;
तसें गालीं हासतां तुझ्या व्हावें,
उचंबळुनी लावण्य वर वहावें !
नारि मायेचें रूप हें प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तूं !
तुला घेइन पोलकें मखमलीचें,
कुडीं मोत्यांचीं, फूल सुवर्णाचें;
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परि आवरिं हा प्रलय महाभारी !
प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे,
कोड किंचित् पुरवितां न ये त्यांचें;
तदा बापाचें हृदय कसें होतें,
नये वदतां, अनुभवी जाणती तें !
देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गांवास जाउनीयां
गूढ घेतों हें त्यास पुसोनीयां !
"गांविं जातों," ऐकतां त्याच कालीं
पार बदलुनी ती बालसृष्टि गेली !
गळां घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येतें मी" पोर अज्ञ वाचा !
गीत | - | कवी 'बी' |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | उदय कुडतरकर |
गीत प्रकार | - | कविता |
अज्ञ | - | मूर्ख, अजाण. |
कुड्या | - | स्त्रियांचे कानात घालण्याचे आभूषण. |
करंटा | - | अभागी. |
कोड | - | कौतुक / आवड. |
गाई पाण्यावर येणे | - | रडायला येणे. |
छीट | - | छापलेले कापसाचे कापड. |
पंक | - | चिखल. |
पोलके | - | स्त्रियांच्या अंगातील चोळीसारखे वस्त्र. |
लंकेची पार्वती | - | अंगावर दागिने नसलेली, गरीब स्त्री. |
लेणे | - | वस्त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम. |
सुम | - | फूल. |