A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गजाननाला वंदन करोनी

गजाननाला वंदन करोनी
सरस्वतीचे स्तवन करोनी
मंगल शिवपद मनी स्मरोनी
सद्भावाने मुदित मनाने
अष्टांगांची करून ओंजळ
वाहतो ही दुर्वांची जुडी.

(सुरेश वाडकर-
अभिमानाला नकोच जपणे
स्वार्थासाठी नकोच जगणे
विनम्र होऊन घालव मनुजा
जीवन हे हरघडी
वाहतो ही दुर्वांची जुडी.

विघ्‍नविनाशक गणेशदेवा
भावभक्तीचा हृदयी ठेवा
आशीर्वाद हा द्यावा मजला
धन्य होऊ दे कुडी
वाहतो ही दुर्वांची जुडी.

पार्वतीनंदन सगुण-सागरा
शंकरनंदन तो दुःखहरा
भजनी पूजनी रमलो देवा
प्रतिमा नयनी खडी
वाहतो ही दुर्वांची जुडी.)

(पं. कुमार गंधर्व-
व्यर्थपणाची व्यर्थ धन्यता
व्यर्थपणाला व्यर्थ मान्यता
व्यर्थपणाला व्यर्थ सजविते
व्यर्थ व्यर्थ हरघडी
वाहतो ही दुर्वांची जुडी.)

गीत - बाळ कोल्हटकर
संगीत - पं. कुमार गंधर्व
स्वराविष्कार- सुरेश वाडकर
पं. कुमार गंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - लहानपण देगा देवा
गीत प्रकार - प्रथम तुला वंदितो, नाट्यसंगीत
  
टीप -
• स्वर- पं. कुमार गंधर्व, संगीत- पं. कुमार गंधर्व, नाटक- लहानपण देगा देवा
• स्वर- सुरेश वाडकर, संगीत- ???.
मुदित - हर्षभरित, आनंदित.
'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकात असलेले संस्करण-

गजाननाला वंदन करुनी
सरस्वतीचे स्तवन करोनी
मंगल शिवपद मनी स्मरोनी
सद्भावाने मुदित मनाने
अष्टांगांची करूनि ओंजळ
वाहतो ही दुर्वांची जुडी.

बालपणीचे दिवस सुखाचे,
आठवतो घडोघडी
आठवणींना, आठवणींची
वाहतो ही दुर्वांची जुडी

आठवणींचे सखे सोबती
आठवणींना अजुनि झोंबती
काही सज्‍जन कोणी दुर्जन
तरुण कोणी कुणी वृद्ध पण
या सर्वांनी विविध गुणांनी
जशी घडवली, तशीच घडली
आयुष्याची घडी
वाहतो ही दुर्वांची जुडी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सुरेश वाडकर
  पं. कुमार गंधर्व