गळ्याची शपथ तुला जिवलगा
गळ्याची शपथ तुला जिवलगा
मुखी सुधेचा कलश लाविला
एकही नाही घोट घेतला
नकोस घेऊ असा हिसकुनी, नकोस देऊ दगा
वेल प्रीतीची तूच लाविली
रुजली फुटली फुलू लागली
नको चुरगळू असा कठोरा, तूच राखिली निगा
तहान हरली भूकही हरली
एकच आशा मनात उरली
पुन्हा बोल ती नाजूक भाषा, तूच जिवाचा सगा
मुखी सुधेचा कलश लाविला
एकही नाही घोट घेतला
नकोस घेऊ असा हिसकुनी, नकोस देऊ दगा
वेल प्रीतीची तूच लाविली
रुजली फुटली फुलू लागली
नको चुरगळू असा कठोरा, तूच राखिली निगा
तहान हरली भूकही हरली
एकच आशा मनात उरली
पुन्हा बोल ती नाजूक भाषा, तूच जिवाचा सगा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | भावगीत |
सगा | - | सोबती, मित्र, नातेवाईक. |
सुधा | - | अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा. |
Print option will come back soon