A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गळ्यात माझ्या बांधा एक

लाखांमधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं
तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं !

ही ऐन भराची उमर लई मोलाची
ही चिक्कणमाती सोन्याच्या तोलाची
अंगामधुनी पिसाट वारं ज्वानीचं भरलं
सख्या तुम्ही बांधा एक डोरलं !

हे घुंगरू बांधण्या कितीदा खाली वाकू
किती किती लाज मी पदराखाली झाकू
चाळांमधुनी वीज पाखरू मनात थरथरलं
सख्या तुम्ही बांधा एक डोरलं !

दोघांत रंगला नजरबंदीचा खेळ
पर हार-जीतीचा बसला नाही मेळ
बक्कळ झाल्या भेटी आता एक काम उरलं
सख्या तुम्ही बांधा एक डोरलं !
डोरलं - मंगळसूत्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.