गणगौळण झाली सुरू
          रिद्धीसिद्धीचा भाग्यविधाता, देव गजानन बुद्धीदाता
तो सुखकर्ता तो दु:खहर्ता, चरण तयाचे धरू
गणगौळण झाली सुरू
कागद करुनी या धरतीचा, कलम-कुंचला मोरपिसांचा
हार गुंफितो कवन फुलांचा, अमृत लागे झरू
गणगौळण झाली सुरू
सूर-तालांची जाता वर्दी, देवादिकांची झाली गर्दी
जमले श्रोते जमले दर्दी, त्यांची सेवा करू
गणगौळण झाली सुरू
          तो सुखकर्ता तो दु:खहर्ता, चरण तयाचे धरू
गणगौळण झाली सुरू
कागद करुनी या धरतीचा, कलम-कुंचला मोरपिसांचा
हार गुंफितो कवन फुलांचा, अमृत लागे झरू
गणगौळण झाली सुरू
सूर-तालांची जाता वर्दी, देवादिकांची झाली गर्दी
जमले श्रोते जमले दर्दी, त्यांची सेवा करू
गणगौळण झाली सुरू
| गीत | - | जगदीश खेबूडकर | 
| संगीत | - | राम कदम | 
| स्वर | - | अरुण सरनाईक | 
| चित्रपट | - | गणगौळण | 
| गीत प्रकार | - | प्रथम तुला वंदितो, चित्रगीत | 
| कुंचला | - | रंग देण्याचा ब्रश. | 
| रिद्धिसिद्धि | - | ऋद्धी व सिद्धी या गणपतीच्या दोन दासी आहेत. | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
 
   
   
   
   
   
   
   
   
   
  











 दाद द्या अन् शुद्ध व्हा !
 दाद द्या अन् शुद्ध व्हा !