A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गाणे स्वातंत्र्याचे

गाणे स्वातंत्र्याचे, गाणे मांगल्याचे
हृदयामधल्या चैतन्यातुन गाणे भारतभूचे

गाणे नसते म्हणावयाचे केवळ शब्द-सुरांनी;
गाणे असते जगावयाचे अपुल्या समर्पणांनी !
समर्पणानी लढलेल्या त्या, गाणे नरवीरांचे !

अनेक भाषा विविध प्रांत हे, अखंड एका ठायी;
तळहातावर प्राण घेउनी भारतभूच्या पायी !
सुख-शांती अन् समृद्धीच्या मंगल परंपरेचे !

सात रंग हे इंद्रधनूतून झुलती आनंदाने
एकच गाणे फुलते ओठी, सजते सात सुरांनी
कोटि कोटि हृदयांतुन गाऊ गाणे अखंडतेचे
गीत - प्रवीण दवणे
संगीत -
स्वर- अवधूत गुप्‍ते
गीत प्रकार - स्फूर्ती गीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.