गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे
गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय
रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय
दयावंत तुजला म्हणती थोर थोर संत
एकरूप आपण दोघे, दूध आणि साय
तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले
तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय
रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय
दयावंत तुजला म्हणती थोर थोर संत
एकरूप आपण दोघे, दूध आणि साय
तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले
तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय
गीत | - | म. उ. पेठकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | बाईनं केला सरपंच खुळा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, प्रथम तुला वंदितो |