A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गे मायभू तुझे मी फेडीन

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.

आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.

आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला !

मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग.. काशी !

आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !
गीत - सुरेश भट
संगीत -
स्वर-
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे.
ललाट - कपाळ.

 

Print option will come back soon