घडीघडी अरे मनमोहना
घडीघडी अरे मनमोहना, हसुनी गुणिजना, देखता नको रे बोलु मशि
भरम धरिल जन तुझा नि माझा, पहा पुरती चौकशी
सजणा नको रे बोलु मशि
छबिदार सुरत साजिरी, दिसे गोजिरी, बरी अवडली समाजा मना
कुठे दिसे ना दुजा पुरुष मज तुजसम रे देखणा
सजणा तुजसम रे देखणा
तुझी प्रीत लाधली कुठुन रोज नीट उठुन तुटुन जीव पडतो झाले पिशी
सजणा नको रे बोलु मशि
सजणि नको ग बोलु मशि
घडीघडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि
दिसतेस चटक चांदणी, अगे साजणी, मनी तू ठसलीस अमुच्या गडे
छंद लागला तुझा अम्हाला रात्रंदिन फाकडे
नीज ध्यास सदा अंतरी, फिदा तुजवरी, घरी मी सिद्ध करुनिया विडे
घरी मी सिद्ध करुनिया विडे
एकान्ति मुखि घालता चकाकतील-
माझ्या हातातील चुडे
इश्काची चटक लागली, जीवा चांगली, रंगली वृत्ती तुजपाशी

गीत | - | शाहीर होनाजी बाळा |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | पंडितराव नगरकर, लता मंगेशकर |
चित्रपट | - | अमर भूपाळी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी, युगुलगीत |
लाधणे | - | लाभणे. |