A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घननीळा लडिवाळा

घननीळा लडिवाळा
झुलवु नको हिंदोळा !

सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली, भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्‍याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा !

सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कलिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- माणिक वर्मा
सुधीर फडके
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट - उमज पडेल तर
राग - पहाडी
गीत प्रकार - चित्रगीत, हे श्यामसुंदर, शब्दशारदेचे चांदणे
  
टीप -
• स्वर- माणिक वर्मा, चित्रपट- उमज पडेल तर.
गोप - गुराखी.
सुत - पुत्र.
हिंदोल (हिंडोल) - झुला, झोका.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  माणिक वर्मा
  सुधीर फडके