A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विठु माझा लेंकुरवाळा

विठु माझा लेंकुरवाळा । संगें गोपाळांचा मेळा ॥१॥

निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥२॥

पुढें चाले ज्ञानेश्वर । मागें मुक्ताबाई सुंदर ॥३॥

गोराकुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ॥४॥

वंका कडेवरी । नामा करांगुळी धरी ॥५॥

जनी ह्मणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ॥६॥
गीत - संत जनाबाई
संगीत - वसंत प्रभु
स्वराविष्कार- आशा भोसले
सुरेश हळदणकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - विठ्ठल विठ्ठल, संतवाणी
  
टीप -
• स्वर- आशा भोसले, संगीत- वसंत प्रभू.
• स्वर- सुरेश हळदणकर, संगीत- ???.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  आशा भोसले
  सुरेश हळदणकर