घरपरतीच्या वाटेवरती
घरपरतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधुक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे
घरपरतीच्या वाटेवरती पडल्याझडल्या शीर्ण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनी उठती पुन्हा
घरपरतीच्या वाटेवरती पायांवाचून पायठसे
अश्रुत चाहूल येते कानी, एक हुंदका एक हसे !
घरपरतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन् पुटपुटती ओठ मुके
घरपरतीच्या वाटेवरती मलूल वत्सल सांजऊन्हे
कुरवाळिती मज स्नेहभराने विसरून माझे लाख गुन्हे

गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | कौशल इनामदार |
स्वर | - | साधना सरगम |
अल्बम | - | शुभ्र कळ्या मूठभर |
गीत प्रकार | - | कविता, नयनांच्या कोंदणी |
अश्रुत | - | अ-श्रुत (श्रुत- ऐकलेले / प्रख्यात). |
वत्सल | - | प्रेमळ. |
शीर्ण | - | जीर्ण / कृश. |