A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घर थकलेले संन्यासी

घर थकलेले संन्यासी, हळूहळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला आठवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी आभाळ घसरले होते

पक्षांची घरटी होती ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळीमागे असतेच झर्‍याचे पाणी

मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई
ये हलकेहलके मागे त्या दरीतली वनराई

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  पं. हृदयनाथ मंगेशकर