गोड तुझ्या त्या स्वप्नामधली
गोड तुझ्या त्या स्वप्नामधली
दाखव मजला तुझी माउली
जिने लाविला बाल मनाला
निज मायेचा रोज लळा
तुझ्या करांची वेळोवेळा
गळा गुंफिली माळ सानुली
याच हातांनी जिने भरविला
दहिभाताचा अमृत काला
या ओठांनी ओठ पुसता
मकरंदाची शिते चाखिली
जिने घेउनी तुला कुशीला
जीव अपुला सुखविला
सांगणार ना कधी कुणाला
अवसेने पौर्णिमा पाहिली
दाखव मजला तुझी माउली
जिने लाविला बाल मनाला
निज मायेचा रोज लळा
तुझ्या करांची वेळोवेळा
गळा गुंफिली माळ सानुली
याच हातांनी जिने भरविला
दहिभाताचा अमृत काला
या ओठांनी ओठ पुसता
मकरंदाची शिते चाखिली
जिने घेउनी तुला कुशीला
जीव अपुला सुखविला
सांगणार ना कधी कुणाला
अवसेने पौर्णिमा पाहिली
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | गृहदेवता |
गीत प्रकार | - | आई, चित्रगीत, कल्पनेचा कुंचला |
मरंद (मकरंद) | - | फुलातील मध. |