A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गोकुळ सोडुन गेला माधव

गोकुळ सोडुन गेला माधव, उभा वाहतो वारा
उदास झाले गोकुळवासी, धेनू न शिवती चारा

कुंजवनीच्या कळ्या जळाल्या फुलल्यावाचून देठी
करपुन गेली बीज-बियाणे भूमातेच्या पोटी
शुकपिकांच्या कंठी झाले सूर थिजुनिया गारा

वार्धक्याची खचली कंबर, तरुणपणा हो वेडा
उंबरठ्याच्या आतच खचला बाळपणाचा गाडा
लावण्याची झडे नव्हाळी गाव गहिवरे सारा
धेनु - गाय.
नव्हाळी - तारुण्याचा भर.
पिक - कोकिळ पक्षी.
शुक - पोपट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.